कन्नड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पळसखेडा शिवारात आढळली. शेतकरी अण्णा पवार यांच्या (दि. २) सकाळी साडेआठला ऊसतोडणी सुरू असताना मजुरांना उसाच्या सरीत बछडे निदर्शनास आले.
ज्या उसाच्या शेतात बिबट्याचे लहान बछडे ला गट क्रमांक ६७ मधील शेतात सोमवारी घटनेची माहिती ग्रामस्थ वाल्मीक पवार यांनी तातडीने वन विभागाला दिली. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी शशिकांत तांबे यांच्यासह वनपाल प्रवीण पारधी, वनरक्षक अनुसया चव्हाण, हरसिंग गुसिंगे, भाऊसाहेब वाघ व इसाक शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाने मजुरांना ऊसतोडणी थांबविण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, मादी बिबट्या दिवसा बछड्याजवळ येत नसून ती रात्रीच्या वेळी येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे बछड्याला सुरक्षित प्लास्टिक कॅरेटमध्ये ठेवून संपूर्ण परिसरावर ट्रॅप कॅमेऱ्यांच्या साहाय्याने पाळत ठेवली जात आहे. मादी बिबट्या व बछड्याची सुरक्षित पुनर्भेट घडवून आणण्यासाठी संबंधित परिसर पूर्णपणे निर्मनुष्य करून वन विभागाचे पथक घटनास्थळी तैनात आहे.















